बाहेरुनी घरामध्ये येशी, व्यर्थ कारे बोलून घेशी गौळी टपले मारायाशी नको जाऊ बाहेरी ॥१॥
तुला देते दही दुध साय, सख्या घरी बसून खाय, नको करु कुणाची चोरी नको जाऊ बाहेरी ॥२॥
तू कान्हा ऐक म्हणे माते, तुला सांगतो मी सत्ये, डाव मांडिला यमुनेच्या तिरी नको जाऊ बाहेरी ॥३॥
तुला देते विटी दांडू, आणिक मोत्याचा चेंडू बळी रामाची संगत धरी नको जाऊ बाहेरी ॥४॥