श्री राम जय जय राम जय जय राम । आरती ओवाळू पाहु सुंदर मेघ:शाम ॥धृ॥
कनकाचे ताट करी धनुष्य बाण । सव्यभागी शोभतसे बंधु लक्ष्मण ॥१॥
वामभागी सुकुमार जनकनंदिनी । मारूती उभे पुढे हात जोडुनी ॥२॥
भरत शत्रुघ्न वारी चौर्या ढाळिती । सिंहासनी आरूढ जानकी पती ॥३॥
रत्नजडित माणिक वर्णु का मुगुटी । स्वर्गाहुनी देव पुष्पवृष्टी करिती ॥४॥
विष्णूदास नामा म्हणे मागणे हेची । निरंतर सेवा घडो राम चरणांची ॥५॥