बाळा जो जो रे ज्ञानेशा चिदरत्न प्रकाशा बाळा जो जो रे ॥धृ॥
ज्ञानेश्वर बोध सकलांना करुनी कौतुक लीला
रेड्यामुखी वेद वदविला गर्व द्विजांचा हरला ॥१॥
बाळ जन्मले गुणराशी रुक्मीणीचे कुशी
देऊनी जगताला उपदेशी सायुज्य मुक्ति कैशी ॥२॥
चालवी जड भिंत चहूमूर्ति चांगा हरली भ्रांती
बाळ जन्मले कविराशी भाद्रपदाचे माशी ॥३॥
कपिला षष्ठीचा हा योग ग्रंथा देई जन्म
समाधी समयाला सुरवर येती विश्वंभर ॥४॥
जीव शीव ते एकसर किर्ति राही अमर
ऐसा पाळणा गाईला बाळा ज्ञानेशाला
विठ्ठल रखुमाई मातेला प्रणाम हो सकलांना ॥५॥