साखर घ्याहो घ्याहो प्रभूनाथा । तुमच्या चरणी ठेविन माथा ॥धृ॥
वैराग्याचे दुकान बाजारात हो, रामनाम साखर भरली त्यात, घेते झाले साधु संत हो ॥१॥
साखरेचा घेऊनी अनुभव, शांत झाले कैलास सदाशिव हो ॥२॥
जनी म्हणे साखर माझी घ्यावी, जागा आपुल्या चरणासी मज घ्यावी ॥३॥