बरव्या दुकानी बैसावे, श्रवण मनाने असावे ॥धृ॥
सारा सार भरा पोती, गिर्हाईक पाहुनी करा रीती ॥
उगीच फुगकरू नका पाहू, पुर्ण साठवावा माल ॥१॥
आम्ही निर्गुण पुरचे वाणी, आमुचे दुकान गगनी ॥२॥
ज्याच्या प्रारब्धी असेल तो ह्या दुकानी बसेल ॥३॥
जैसे संत तैशी वाणी, तुका बैसला दुकानी ॥४॥