हट्टाने दामुशेटी तातडीने आला नैवेद्य धाडीला नाम्यासंगे ।
नाम्यानी नैवेद्य कुंचीखाली झाकिला ॥धृ॥
आणूनी ठेविला देवापुढे देवापुढे ॥१॥
नाही अमंगल आहे निर्मल केली मी आंघोळ चंद्रभागे चंद्रभागे ॥२॥
का रे हालेनासी का रे जेवीनासी घरी माझी माता वाट पाहे वाट पाहे ॥३॥
पाषाणाची मूर्ती कापे थरथरा जेवी भराभर नाम्या संगे नाम्या संगे ॥४॥
नामा म्हणे माझी वडीलांची ठेव सापडले धन विटेवरी विटेवरी ॥५॥