माती तुडविता नाही देह स्थिती । आठवितो चित्ती पांडुरंग ॥धृ॥
गोर्होबाची कांता । पाणियास जाता । पुत्राला पहाता खेळवते ॥१॥
दृष्टी असू द्यावी स्वामी बाळावरी । नाही कोणी घरी सांभाळाया ॥२॥
तुका म्हणे गोरा नाही देहावरी । सर्वत्र निर्धारी पांडुरंग पांडुरंग ॥३॥