मुद्रिके सखे तू होतीस रामापासी सोडीले तु श्रीराम कोठे वनवासी भ्रमतात वनामधे व्याघ्रसिंह अनिलासी, रक्षिले किंवा भक्षिले वनी ग राक्षसी माझ्या कंचुकीसाठी राम उठे लवलाही मजपासून गेले तसे देखीले नाही ॥ जानकी शोक करी वनी मुद्रिकेबाई सोडिले तू श्रीराम कोणते ठाई ॥धृ॥१॥
मुद्रिके सखे तू आलीस कोणा कुणी नाही पंख तुला कर्प देह पाठविले कोणी का बोलत ना तू काय वर्तले चीन्हे वनफळा लागे जातसे लक्ष्मणा तान्हे ॥२॥
मुद्रिके सखे गे वनी निघालो तिघे वनी चालवेना मला बहूत त्वरेना वेगे मी अंतरले म्हणूनी राम पाहतसे मागे हे उभा राहित श्रीराम लक्ष्मण दोघे कुरवाळून मज मुख
रघुवीर निजअंगा हा कर्म भवेचा नको सितेवरी क्रोधा ॥३॥
ह्या वृक्षा वरती होता अंजनीपुत्र तू कोणकुणाचा काय तुझे रे कुल गोत्र- मी सेवक जरी रामाचा नाव तुझे काही का बोलस नारे शिघ्र वीरनवलाही ॥४॥
मारुती म्हणे गे अंजनी माझी माता कपीकुल देहाचे नाव मारुती आता तुझ्या शोधाला गे धाडीतसे अनंता हे अठरा पद्य वानर मिळाले साही हे समुद्र उतरुनी सुवेळ मजला ठायी ॥५॥