मिरा रंगली रंगली , कृष्णरूपी तल्लीन झाली ॥धृ॥
जिकडे पाहावे तिकडे कृष्ण कृष्णमय हे जीवन, अंतर्बाह्य होऊनी कृष्ण देहभान विसरली ॥१॥
मुखी नामाचा उच्चार, करी टाळांचा झंकार । हरी भक्ती दाटे अनिवार, बेहोष नर्तकी झाली ॥२॥
आता कोठला संसार कैसे सासर माहेर, निर्गुण निराकार परब्रह्मी लीन झाली ॥३॥
धन्य मिराबाई, सुख दु:खा पार जाई, निजानंदी डुबत राही, मग्न हरी रूपी झाली ॥४॥