कुलुप झाले बंद । किल्ली सापडेना । कोठार खजिना भरला असे ॥१॥
किल्लीचा मालक तो हा सदगुरु एक डोळे उघडूनी देख परब्रह्म ॥२॥
दामाजी पंताने कोठार फोडीले । धनी एक केला पांडुरंग ॥३॥
जनी म्हणे देवा कैसी करू सेवा । शूळा पाशी उमा पांडुरंग ॥४॥
तुका म्हणे ऐशा किल्या झाल्या किती । देहाचे संगती कोणी नाही ॥५॥