मोरावरी बसली विधी कुमरी ॥धृ॥
हाती वीणा मुगुट मस्तकी पैठणी जरतारी ।
नेसली, पैठणी जरतारी ॥१॥
ब्रह्मा विष्णु सुत तुज गाती ।
वर्णिती वेद चारी ॥ तुजला, वर्णिती वेद चारी ॥२॥
तिन्ही लोक तुज मंगल गाती । कुंठित झाली माझी मती ॥३॥
झाली विद्यादेवी जे तुज गाती । अज्ञान निवारी त्यांचे ॥४॥