नवलाचि हो गोष्ट ऐक गडे बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी । भजनी गायनी गोराबा रंगले ॥
जय जय विठ्ठल रखुमाई । एक रूप झाले विठ्ठलाचे पायी ।
रांगत खेळत बोबडे बोलत बाळ तेथे आले लक्ष त्याचे नाही । चमत्कार झाला बाई ग चमत्कार झाला ।
विठ्ठल धावला विठ्ठल धावला । गोरोबाच्या बाळा पुन्हा जन्म देई ॥