बाळा जो जो रे जो जो, जो जो । गोविंदा गोपाळा घननिळा । इवले डोळे घे मिटूनी ।
श्रीरंगा लडिवाळा नको वाजवू छुमछुम वाळा निज आता गोपाळा ॥१॥
नको करू देगा श्रीरंगा, चंद्रकोर बघ कलली रुसु नको कृष्णा तव कृष्णा कळली रे मज बाळा ॥२॥
घे अमृत घे तूच मजला, नवजीवन दिधले । स्वप्न नवे माझ्या नयनी रे फुलले रे घननीळा ॥३॥