देवी भवानी कुलस्वामीनी भजू या ग पुजू या ग वरदायिनी ग ॥धृ॥
सुजनाना रक्षावया आसुरांना निर्वाळाया । राज्य असे अखंडीत रिपुनाशीनी ग ॥१॥
अष्टभूजा महादेवी । शस्त्रे आयुधे करी घेई । सिंहावरी आरूढली रणरागिणी ग ॥२॥
शक्ती हीच उपासना । शौर्य धैर्याची साधना । भजु या ग वंदु या ग वरदायिनी ग ॥३॥