जगव्यापक हरिला । नाही कसे म्हणावे ॥धृ॥
मुक्तासी तेज पाणी । पुष्प सुंगध तो हा मलयागिरी सुवासा । नाही कसे म्हणावे ॥१॥
तंतू पटी मिळाला । पाणी नभापरी हो । घट मृत्तिका निराळा । ऐसे कसे म्हणावे ॥२॥
गोडी ती शर्करेची । पाखडिता न ये बा । भिन्नत्व हेम वस्तु । ऎसे कसे म्हणावे ॥३॥
मी सांगतो तुम्हा । निर्गुण देव तो हा । अमृतेश्वराचे वचनी । प्रभु नाही का म्हणावे ॥४॥