चला पंढरीला जावू, रखुमादेवी वरा पाहु । गेले सांगुनीया संत टाळ मृदुंग नादात ।
जीव वेडावूनी जातो, छंद देवाचा लागतो । पुंडलिकाच्या भक्तिला, देव विठ्ठल भुलला ।
भुलवीत सकलांना , उभा राहे विठुराणा । येथे भेदभाव नाही घाला घट्ट मिठी पायी ।
सारा विसरू संसार, घालू देवापरी भार । चला जावे माहेराला, सुख दु:ख सांगायला ।
गात पंढरीसी जावू, चंद्रभागे मध्ये न्हावू । वाटापहात रहिली , उभी कधीची माऊली ।