हिमालयाच्या घरच्या नारी हसती पार्वतीला ॥धृ॥
शुद्ध स्पटिका सारखा नवरा मिळाला गौराबाईला ।
बापाचा तर ठाव नाही वरमाई ती शून्य ।
नाहीत नणंदा नाहीत जावा केवढं इचं पुण्य ॥१॥
घण घण घंटा नीलकंठा पुढे वाजतो शंख ।
वाजंत्रीला पैका नाही तो का बेटा खंक ॥२॥
महादेवाची वरात निघाली छळवणुक सार्या लोकाला ।
वर्हाडणीची पोरे म्हणती आई बागुलबुवा आला ॥३॥
पार्वतीचे रूप पाहुनी ब्रह्मा पळुनी गेला ।
मध्व मुनिवर स्वामी रमापती नमितो शिवचरणाला ॥४॥