तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम । वसो तुझे नाम माझे चित्ती ।
सुभक्ती विचार राहो माझे चित्त । हिच कृपा मुर्ती द्यावी मज ।
तुझी दास जगी म्हणवितो विख्यात । पसरला हात फिरवू नको ।
नामा म्हणे देवा इतुके द्यावे मज । ऐकूनी केशवराज होय बोले ।
भेटी लागे जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।
पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझे मन वाट पाहे दिवाळीच्या मुला लेकी आसावली ।
पाहतो वाट पांडुरंगा । भुकेलिया बाळ अती शोककरी ।
वाट पाहे परी माऊलीची । तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धाऊनी श्रीमुख दावी वेगे ॥