रात्रंदिवस तुम्ही सावध असा रांत्रदिवस तुम्ही सावध असा ॥
तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, उजेड पडता गळा पडेल फांसा, उठाजी मायबाप उठाजी कशी लागली झोप । हुजर जाऊनिया एवढी चुकवा खेप ॥धृ॥
तुमची नांदुणुक आम्हां दिसेना बरी । तुमच्या सेवेला दोन लोभिष्ठ नारी । त्यांच्या योगे दु:ख नगरीत भारी ॥१॥
हिंडत जन्मांतरी लक्ष चौर्याशीं जागा । अजूनी आठवेना मुळचा मार्ग आमच्या बोलण्याचा तुम्हाला येईल राग ॥२॥
मागल्या ठेवणीचा काही ऐवज काढा । त्यांच्या सत्तेने आम्ही बोलू घडघड । एका जनार्दंनी धरा बळकट मेढा ॥३॥