आज भाग्य उजडेल राम घरी आले-लक्ष्मणसह बाई घेऊनी सीतेला ॥धृ॥
आनंद भरांत सारी नगरीं सजवा-केशव कस्तुरीचे कोणी सडे ग घाला झालर मोतीयाने रत्नजडीत सिंहासनाला जडीत आसनाला ॥१॥
जाऊन सांगा कोणी माझ्या भरताला-रामप्रभु आले आयोध्यापुरीला भरत घाली लोटांगण प्रभू चरणाला ॥२॥
वर्णी न जाई हा सुख सोहळा देव विमानांतून आले पुष्प वाहाया ऋषी धन्य धन्य झाले प्रभु दर्शनाला ॥३॥