श्री शनीदेवा सुर्यानंदना सारे । दैत्य केले तुम्हीं मर्दना दैत्य केले तुम्हीं मर्दना ॥धृ॥
राहू केतू शनी म्हणे सोडावी आमची बंधना ॥१॥
राजा विक्रमासी शनी आले साडे सात वर्ष भोगविले फार फार केली दैना ॥२॥
गुरुरायासी शनी आले घेऊनी सुळापाशी गेले सव्वाप्रहरात केली दैना ॥३॥
शंकरासी शनी आले येतो म्हणूनी सुचविले कैलासी लपले रघुराणा ॥४॥
रावणासी शनी आले पालथे होते उताणे केले स्मशानांत निंदीली रामराणा ॥५॥
राहू केतू शनी म्हणे सोडीली आमुची बंधना ॥६॥