माहेरी जाते मी आता जाऊ द्या मला, जाऊ द्या मला । माहेरच्या वात्सल्यात न्हाऊ द्या मला , न्हाऊ द्या मला ॥धृ॥
माहेर माझे दूर पंढरपुरी, विठाई माऊली माझी मायाळु खरी, तिच्या कुशीमध्ये आता जाऊ द्या मला हो जाऊ द्या मला ॥१॥
नाथांची रसाळ गौळण वेडी भोळी । ज्ञानेश्वरी मोत्याच्या जणू ओळी तुकोबाचे ही अभंग, गाऊ द्या मला, गाऊ द्या मला ॥२॥
पायीची चंद्रभागा न्हाऊ घालील, अबीर बुक्का, कुंकू भाळी लावील, सौभाग्य हेची थोर लेऊ द्या मला लेऊ द्या मला ॥३॥
निरिच्छेच्या या गावी सौख्य झरे । वैराग्याचे लाभणार वैभव खरे, प्रसाद मोक्षपदाचा सेवू द्या मला, सेवू द्या मला ॥४॥
अशाश्वताची ओढ आता पुरे । अनादी शाश्वत त्याची आस ठरे, विटेवरी चे ते ब्रह्म, पाहु द्या मला, पाहु द्या मला ॥५॥