वेद जया लावी नित्य वाखाणिती । तो वेद मूर्ती पांडुरंग । रवी शशी दिप्ती जेणे प्रकाशती, पाचा भुतांची ही करितो झाडणी तो हा चक्रपाणी पांडुरंग । राजा त्रैलोक्याचा गुरुराजा स्वामी वसे अंर्तयामी पांडुरंग ॥१॥
प्रभा ही जयाची पसरली जनी चिद्रूपाची खाणी पांडूरंग । परोपकारालागी अवतार केला । आनंदाचा ठेवा पांडुरंग ॥२॥
एका जनार्दनी देह हरपला, होऊनी राहिला पांडुरंग ॥३॥