नाथाची भोळी भक्ती । रिद्धी सिद्धी चारी मुक्ती प्रसन्न झाली । गंगेचे करुनी स्नान अर्ग्य सूर्याला । गंगेचे उदक झारीत आले वारीत वाट सारीत नाथ आपल्या मंदीरी आला । चंदनाचे पाट घनदाट नित्य नेमाला देवासी घालूनी आंघोळी पुष्पे मंजुळी भरुनी, ओंजळी भावे काला बहुत सुगंध केवडा, प्रेम रामाला संतोषले गोपीनाथ, पाहिला अंत ते भगवंत की भावे काला हरी, प्रल्हाद विभीषण बंधू उद्धरल्या, कुब्जादासी कृष्ण अंग अंबाऋषी कौरव पांडवापासी, कैकांचे विघ्न वारीले दुष्ट मारीले भक्त तारीले की नाना छंद, ब्रह्माची ब्रह्मापुरी । एक प्रेमानंद, धन्य धन्य एकनाथ महाराज गंगातीरी पैठण नगरी भक्ताघरी आले गोविंद ब्रह्मची ॥धृ॥१॥
नाथाची भक्ती पाहूनी द्वारकेहूनी आले धावूनी कि, पैठणाला, हरी बालक होवूनी हाका मारी एकनाथाला । नाथांनी देखिले बाळ रूप वेल्हाळ आली कळवळ, पुसते त्याला । मुला तू कुणाचा कोण कुणाकुनी आला, सांगा बा मजला हरी म्हणे । मी ब्राह्मणाचा पुत्र नाही माय बाप तीळभर गोत्र सांगायला । पोटासाठी कष्टी दोन प्रहराला, द्या अन्न वस्त्र पोटाला, नित्य राहील तुमच्या सेवेला, श्रीखंड्या नांव आहे माझे, अशी हांका मारावी मजला, श्रीखंड्यांनी धरूनी चाकरी, नाथाच्या घरी की नाना छंद ॥२॥
नाथाच्या घरी आवडी आणि कावडी की रुक्मीणीकांत । नाथाचे धुवूनी धोतर आणि गंगेत । ऊन ऊन पानी आंघोळीला, विसन घाली त्याला लावी अंगाला की अपुले हस्त । मग वस्त्र नेसूनी शिनी नाथ गेले देव घरात, देवाची करुनी देव पूजा भाव नाहीं दुजा कृष्ण महाराजा की पूजिती मूर्त, एकाग्र चित्त देवूनी कृष्ण मूर्ति आणिली ध्यानांत, श्रमले किर्तनांत, नाथाचे दावी पाय हात, बिलोकाचा पालक होऊनी बालक की उगळी तो गंध ॥३॥
वैकुंठनाथ तल्लीन होते बहू दिन कैलासाहून महादेव आले, द्वारकेंत नाहो भगवान कुणीकडे गेले, अंतरी शोध पाहिले दूर राहिले कि, अवधूत झाले, येऊनी गंगेचे तीरीं उभे राहिले, श्रीखंड्या धुई धोतर त्याच्या समोर उभे शंकर की पुसते झाले, येथे कोणते एक एकनाथ सांगा ते पहीले श्रीखंड्याने ठेवूनी कानावरी हात, कोणते एक नाही माहित आम्हां नाहीं कळलें आम्हीं राहणार नाही इथले, आहे दूरचे, श्रीखंड्याने धुवूनी धोतर गेला आपुल्या ठायासी, त्याच्या मागूनी शंकर, नाथानी देखिला जोगी जोगी म्हणे तुझा चाकर दाखव लौकर घेतला छंद ॥४॥
नाथ म्हणे बालका कोण आला सखा मारीतो हांका उभा आहे द्वारी, नाथाचे भाषण ऐकता देव गेले घरी गृह आले हारीनाथ म्हणे हे काय विपरीत झाले, कौतुक माझ्या मंदीरी, देवानी केली चाकरी माझ्या अनाथाच्या ब्राह्मणाच्या घरीं, नाथ म्हणे देवाला कसें टाकून गेले आम्हांला. हरी म्हणे नादाला येईल वर्षेच्या षष्ठीला, खुण पटेल मनाला, पाणी चढल रांजणाला, हरीभक्ताच्या चरणावरीं माधव मल्हारी की माते गडे बंधू ॥५॥