वाढे गावी पुण्य क्षेत्री वसे नरहरी । सान्निध्य वाहे कृष्णामाई संगे माऊली ।
छान छबेला घेऊनी उभे वृक्ष छायेला । दत्त दर्शनासीं चला लाभ जाहला स्वामी ।
दर्शनासी चला लाभ जाहला ॥धृ॥
वरकटी जाऊनी नमन करूया स्वामी चरणाला सद्गुरु चरणाला, दत्त ॥१॥
औदुंबरी आसनी घालून बसे सावळा । गळ्यात रुद्राक्षांच्या माळा जटा पिंगळ्या ।
भगवी वस्त्रे कमंडलू दंड शोभला ॥२॥
मोठे मोठे भक्त येवोनी पूजन करीताती । पंचामृती स्नान घालूनी नैवेद्य अर्पिंती ।
आरती धुपारती करुनी लोटांगणे घाला ॥३॥
किती एक तुम्ही समंध व्याधी भक्ता तारीती । नामस्मरणे श्रीहरी भजने पतित उद्धरले ।
वांझ स्त्रियेला कन्या पुत्र प्रेमे त्वा दिधले । अत्रि अनुसयेच्या पोटी दत्त जन्मले ॥४॥
दत्ता तुमचे मंदिर पाहता दिसते सुंदर । आत मूर्ती बसविली दत्त दिंगबर ।
ध्यान प्रभुला शरण जावे सद्गुरु चरणाला स्वामी चरणाला । उभा पाठीला ॥५॥