ऐकत नाही काही आमचे मुरारी सावळा । यशोदे सांग तुझ्या कृष्णाला यमुनेला ग आम्ही जाता ।
काय करावे वाट अडविता । खडे मारूनी लपुनी बसता , शोधु कसे ग गोविंदाला ॥१॥
मंथन करिता गुपचुप येतो, आणि नवनीत चोरुनी नेतो । कसा ग येतो कोठे जातो ।
उमज पडे ना काही मजला ॥२॥
वाट अडवूनी बाजाराची करी मागणी दह्या दुधाची, रोज कशी ग पुरवायाची ।
समजावुनी तू सांग त्याजला ॥३॥