घडी घडी मनीं तुझे नांव जपावे चित्त स्थीर होवूनीया चरण धरावे अनुभव घ्यावे ॥धृ॥
कोणा आवडतो संसार ही सारा घरदार सारा मोह पसारा परी दुःख वाटे अंतरी भोगावे अनुभव घ्यावे ॥१॥
सगुण सागर रूप ते सुंदर ध्यान ठेविताची चित्ती परे कळे काट-संत साक्षी देता ग्रंथासी वहावे ॥२॥
आम्हां साधकासी हाची मार्ग सोपा, जन्म मरणाच्या चुकवाव्या खेपा तुकड्या म्हणे रे क्षण एक न जावा फुका ॥३॥