राधे तुला बोलवितो वनमाळी ॥धृ॥
जरी पदराची चोळी बुट्याची, चंद्रकळा काळी काळी ग ॥१॥
कर्ण फुलावर टिक हिर्याची शिरी मोत्याची जाळी ॥२॥
जनाबाई म्हणे बघतो श्रीहरी, भक्ती माझी भोळी ॥३॥
क्षीरसागरी हरी कान्हा यशोदेच्या घरी ।
रांगु लागला हरी आंगणी माथा जायफुलाची वेणी ।
पायी पैंजण वाक्या वाळे, हाती नवनिताचे गोळे ।
धन्य धन्य यशोदामाय , नामामुखाकडे पाहे ॥