आभाळीचा चांद बाई आज माझ्या अंगणात । पंढरीचा राया दळी जनीच्या घरांत । किती करी काम देवा घेई रे विसावा । हेचि एक एवढे रे मान किती घ्यावा घनश्याम विठ्ठला रे पंढरीच्या नाथा देवा । धावुनिया भक्तासाठी वृथा क्षण वाया जरा थांब रे देवा कोमल हे तुझे हात ॥१॥
किती माझ्या संगे देवा गावुनिया गाणे । भागलासी आता पुरे चक्रपाणी । कटी पिंताबर शोभे गळा वैजंयती माळा असा हरी गरिबाचा झोपडीत झोपी गेला । सावळीच मूर्त राही, सही सदा नयनांत ॥२॥