गाईला गोग्रास तुळसीचे पूजन नंदाचा नंदन तेथेच बसे ॥धृ॥
शत ब्राह्मणासी करीता अन्नदान जान ते प्रमाण भारताचे ॥१॥
ज्याच्या घरीं गाय त्याला उणे काय सर्वही अपाय नष्ट होती ॥२॥
गायीसी विकाल सुखासी मुकाल द्रव्य रूपी घ्याल नर्क हाती ॥३॥
असल जातीचा नकरी निंद्य कर्म त्याच्या घरी वसे सदा मेघःश्याम ॥४॥
बाळ म्हणे माते नका लावू डाग सुख दुःख भोग दो दिवसाचे ॥५॥