श्रीराम जय जय राम जय जय राम । आरती ओवाळू पाहू सुन्दर मेघःशाम ॥धृ॥
कनकाचे ताट करी धनुषबाण । सव्य भागी शोभतसे बंधु लक्ष्मणा ॥१॥
वाम भागी सुकुमार जनक नंदिनी । मारुती उभे पुढे हात जोडोनी ॥२॥
भरत शत्रुघ्न वारी चवर्या ढाळीती । सिंहासनी आरूढले जानकी पति ॥३॥
रत्नजडित माणिक वर्णु काय मुगुटी । स्वर्गाहुनी देव पुष्पवृष्टी करीती ॥४॥
विष्णुदास नामा म्हणे मागणे हेचि । निरंतर सेवा घडो रामचरणाची ॥५॥