वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे ॥धृ॥
वेणूनादे गोवर्धन गाजे । पुच्छ पसरूनी मयूर विराजे । मज पाहता भासती यादवराजे ॥१॥
तृणचारा चरू विसरली । गाईव्याघ्र एके ठायी झाली । पक्षीकुळे निवांत राहिली । वैरभाव समूळ विसरली ॥२॥
यमुनाजळ स्थिरस्थिर वाहे । रविमंडळ चालता स्तब्ध होय । शेष कूर्म वराह चकीत राहे । बाळा स्तन देऊ विसरली माय ॥३॥
ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती बाकी रुणझुण रुणझुण वाजती । देव विमानी बसुनी स्तुति गाती भानुदास पावली प्रेम भक्ति ॥४॥