प्रपंच विटले मी देवा दे तुझ्या चरणी दे ठावा ॥धृ॥
सगुण म्हणूं तुज निर्गुण म्हणू का वेडी झाले मी देवा निजधामी आहे तुझ्या रहावा ॥१॥
मथुरेमध्ये जन्म जन्म घेतिला कंसही संहाराया, गोकुळामध्ये दाविली लीला गोप ही गोपीकेला वश झाला, राधिकेच्या भक्तीभावा ॥२॥
मागणी आहे ही माझी थोडी तुझ्या नामाची लागो गोडी, रुक्मीणीला घडो तुझी सेवा ॥३॥
*