लाडक्या राणीला लागले डोहाळे पुरवा सोहाळे रामराया ॥धृ॥
आनंदी आनंद कोंदटला मंदिरी सौभाग्य सुंदरी सीताराणी ॥१॥
लाजेचीया लाली गोरठल्या गाली मुखावर आली गर्भकांति ॥२॥
मनी हुरहुर सासु देई धीर संभाळ जानकी वंशाचा अंकुर ॥३॥
तान्हीया बाळाची उद्याची आई लाजे सीतामाई मनोमनीं ॥४॥