उभी समोरी स्वामी माऊली सुखावले लोचन, रंगले ब्रह्मानंदी मन ॥धृ॥
इथे राज्य त्या प्रभु रामाचे । दशरथ नंदन रघुनाथाचे, दृष्टी पुढुनी हळु हळु सरले । दिव्यची रामायण ॥१॥
इथेच दर्शन कृष्ण हरीचे झळकत वैभव द्वारावती चे अजुनी येती स्वर कोमलते, प्रभु पायी पैंजण ॥२॥
इथे मनोहर ध्यान शीवाचे, रूप विलसते वैराग्याचे । शीरी गंगा ही अवीरत शीव पदी करी मंगल सीचन ॥३॥
इथे टिपावे कण ज्ञानाचे, स्वरूप सोज्वळ ज्ञानेशाचे, काठी भीमेच्या अभंग तुक्याचे ऐकती जग जीवन ॥४॥