कशी मौज उडवी हरी माया भुलवाया-असुराया-हरी मोहिनी झाला सकल दैत्य निवडाया ॥धृ॥
हरी हा कपटी महा भुलवूनीया विष वाढी पाहा- अमृतभर भर देव गणासी वाढीती सुंदर माया लागलै असूर खुणवाया ॥१॥
भुलती असुर किती वाढी अमृत तू चल म्हणती वाढीन परी मी आट सांगते बोलू नका कुणी वाया तुम्ही स्वस्थ बसा ठाया ॥२॥
बोलूं नका तिची अवका-न कळे ब्रह्मादिक आणिका अमृत जाईल सुंदरी जाईल लाविल अपनासी लया सुखी देव करीन ती जाया ॥३॥
ठकले किती ग भले शंकर मार्कंडेयही फसले तेथे असुराचा पाडची कैसा धाक लागे न वाया मी नटले तिचे गुण गाया ॥४॥