रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणी चोहीकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे ॥धृ॥
तरूवर भिजल्या भिजल्या वेली, ओलिचिंब राधा झाली लवून बघता वरती भिजली, दचकूनी माझा उर उडे ग बाई ॥१॥
हांक धावली कृष्ण म्हणूनी रोखूनी, धरली दाही दिशांनी खुणाविता तुज कर ऊंचावूनी गुंगत मुंजत मुदा चढे ग बाई ॥२॥
जलाशयच्या लक्ष दर्पणी, तुझेंच हंसरे बिंब बघोनी हसतां राधा हिरव्या रानीं पावसांत हे ऊन पडे ग बाई ॥३॥