मांगल्याची तू मूर्ति । वंदन तुजला सरस्वती ज्ञानदीप हा लावी भारती ।
कृपा प्रसादे करीऽऽ जागृति ॥धृ॥
यशो दुंदुमि दारी वाजती, भारत वैभव गाजो जगती । मम साधना नाम जपाची ।
गमते मजला शांति सुखाची हवी कशाला तपोसमाधी ॥१॥
नच आचरिले मौनहि कधी माळ न ल्यालो रुद्राक्षांची । भस्मांकित तनु मुकुट शिरी ।
दंड कमंडलु शंख चक्रकरी । नाम जपाचे अधरी सन्तांची ॥२॥