प्रथम आरंभू ग देवा गणपति । साह्य होईल ग माता सरस्वती । एकादशी वर्णावया द्यावी मज मति । पुण्य पावन म्हणती एकादशी । ते व्रत विष्णू सांगती इंद्रासी । षोड्पोचार इंद्र पूजा करी । नाना वाद्ये वर वाजंत्री वाजती । ऋषी म्हणती पुढे आहे मोठी किर्ती । सकली देवांगण मिळूनी गाणे गायी । नगर नारीची ती पुष्पे ती सरली श्रृंगार वाड्याची ती फुले पुष्पे चांगली । रुख्मांगद राजा हा सकाळी उठला । चरण चाळीत मळ्याशी गेला । हांका मारितो समस्त माळीला फुले कोमल आणा उपवर भोगायाला । फुले आणाया गेले अवघे माळीजन, फुले फुलभार चोरी नेलासा उतरून । एकून एक फुले नेलेस वेचून, फुले चोरटे हे आले असेल कोण । लटके सांगता हो मजपाशी येऊनी । दोन प्रहर रात्र ही लोटली । थोर धाक अंगी हुडहुडी भरली । ग्रंथीक झाडीची त्यांनी आघाडी हो केली । ग्रंथीक घुमान हो लागली विमानी । एवढे दोषी विमान बसले भूमीशी । थोर माळी मनी आनंदला । तो हरक आनंद रायासी सांगू गेला राव आम्ही चोर धरियेला । मुखपाल ते घालूनी निजविला राव म्हणती नाही काही । आणखी येऊनी तुम्हासी सांगती । काय आहे हो त्याची दिव्यकांती । रुख्मांगद राजा हा सकाळी उठला चरण चालत माळीयाशी गेला कारण वचन रुख्मांगदाने केले ते म्हणती काय असे तुझ्या चित्ती । तुमचा ठाव ठिकाण आम्ही स्वर्गीचे गंधर्व, फुले आणावया धाडीले इंद्रराव । तोही नेमाने पूजितो विष्णुदेव, त्याचे नाव प्रत्यक्ष केशवराजा म्हणतो भले पवित्र दिसता चोरी करिता काय आधारिता एकाच नेऊनी हो एकाला वाहता, काय हो होईल तुम्हाला सारिथ्य । पाप पुण्य आम्हा काही ना लागत । पाप पुण्याची त्वा केली असे हानि स्वर्गींचे विमान बसले धरणी । पाप पुण्य आम्हा काही ना लागत, गंधर्व म्हणती काय करशी दानधर्म, नाही केले एक एकादशी पूर्ण, काय आज्ञा द्यावी मज सेवकासी । सहस्त्र गायी देती ब्राह्मणासी, वाट होऊ द्या हो तुमच्या विमानाशी । सोनदान देतो ब्राह्मणाला, वाट होऊ द्या हो तुमच्या विमानाला । गांव मोकाशी देती ब्राह्मणाला, वाट होऊ द्या हो तुमच्या विमानाला । गुणमति जातो वैराग्य घेऊन । गंधर्व म्हणे काय करशी दानधर्म, नाही केले एक एकादशी पुण्य नाही देखीली स्वप्नी एक एकादशी । शास्त्र काढुनी नीट सांगावे आम्हाशी । गंधर्व म्हणती हेची यथार्थ साहित्य । दशमीच्या दिवशी अळणी दहीभात । पंगतीशी घ्यावा एक आतिथ्य । दांत कोरूनी तुळस घालावी मुखांत, दुसरे दिवशी करावे गंगास्नान । मग करावे देवदेवार्जन । मग करावे श्रीहरीचे पूजन । बारा ब्राम्हण घालावे बारशीशी, बारा न घडे घालावे पांचाशी । पांच न घडावे घालावे तिघाशी । तिघ्याशी न घडे घालावे एकाशी । एकाशी न घडे घास घालावे गाईशी, गोग्रास न घडे फुले वाहावी देवाशी । फुलपुष्प हे भगवंत पूजन ते केले अंबऋषीने, साधन त्या घरी जन्म घेती हो भगवान, ज्याचा भाव आहे देवापाशी, त्याचा चर्तुभुज आहे कृष्णाजी पाठीशी । पिताबंरची सांवली करा त्यासी त्वरा करा, । नगरामध्ये डांगोरी पिटती । जन लोक हे जेवले म्हणती सासु सुना त्या ग दोन्ही परटीनी तिचे नाव आहे आबाई । त्याही दोघीचे झाले भांडण । भांडता भांडता नाही भक्षिले अन्न । आण म्हणती चौकशीने परटीण । तिचे नांव आहे आबई म्हणून तिची । होती धारावतीसून तिच्याकडूनी गंगास्नान । तिच्या पुण्याने वरती चढले विमान । ते व्रत राजाने धरिले चित्ताशी । हत्ती घोड्याच्या पागा ठेविल्या उपाशी । गाई म्हशीचे कळप ठेविले उपाशी । शेळ्या मेंढ्याचे खिल्लार ठेविले उपाशी नगरासहीत राजा एकादशी करी । जे मरे ते जात वैकुंठाशी । थोर राग आला या यमदूताशी मग दूत पाचारी चिठ्ठ्या टाकी ब्रम्हदेवाशी । ब्रह्मदेव पाचारी म्हणतो मोहिनीशी । मोहीनी जाई ग मृत्यूया लोकाशी । मोहीनी घेतली मोहीनीची माळ । मोहीनी बसली ग वृंदावनी अनुष्ठान, ती देखिली राजानी नरानी, राजा म्हणतो तू कोणयाचो कोण? मोहिनी म्हणती मी आहे देवांगना । ऐसा योग्यवर पाहिजे हो मज जे माझे वचन ऐकील, जे मी सांगेल तेची ऐकेल माळ घाल भ्रर्तार लागून, राजा म्हणतो तुझे वचन पाळील । मोहिनीनी माळ घातली राजकाला, मोहिनीनी माळ घालूनी राजा भूलवूनी टाकिला, राजा उन्नात मदमस्त झाला । कुणी एके दिवशी डांगोरा शब्द ऐकिला शास्त्र काढून नीट सांगत होतो जनाला । कसे उरफाटे झाले असेल मजला । मोहिनी जवळ पदर धरीला । कुठे जातो सांगरे श्रीहरी, मी जातो ग आपल्या गृहासी । उद्या आहे ग व्रत एकादशी, मग सोडीन साधन द्वादशी । मग येईन तुझीया मंदिराशी, तुझ्या पुत्राचे शीर देई माझ्या हाती । मग कर तू व्रत एकादशी, राजा पाचारी रुख्मगंदाशी स्त्रियेशी । कसे येते ग तुझ्या विचाराशी । तुझ्या पुत्राचे शीर मोहिनी मागते आम्हाशी नाहीतर मोडा एकादशी । हरीचंद्रराजा स्वप्नी देखिला । डोंबाघरी वाहतसे पाणी । त्यांनी आपले सत्व जाऊ दिले नाही । माझ्या पुत्राचे शीर तुम्ही सुखे द्यावे । व्रत एकादशी नाहीच मोडावी । राजा पाचारी तो रुक्मागंदाया सुनासी । कसं येत ग तुझ्या विचाराशी । तुझ्या कांताचे शीर मोहिनी मागते आम्हासी । नाहीतर मोडा व्रत एकादशी । माझ्या क्रांताचे शीर सुखे तुम्ही द्यावा । व्रत एकादशीचे नाहीच मोडावे । राजा पाचारी धर्मगंद या पुत्रासी । कसं येत रे तुझ्या विचारासी तुझं शीर मोहिनी मागे आम्हासी । नाहीतर मोडा म्हणे व्रत एकादशी शीर सुखे तुम्ही द्यावे व्रत एकादशी नाही मोडावे । त्याही चौघांचे झाले एकमत । मोहीनी बोलली उगाच हेडसावून । डावे हाती काय करशील दानधर्म । राजाने खड्ग धरिले उजवे करी । शंख चक्र पिंताबर धारी, देवाने झेलीले असे वरचे वरी । त्याही चौघांना आले असे हो विमान । विमांनी बसले ते चौघे जण । आम्हाकडून करविली एकादशी तू तर विमानी एकला कसा जाशी । हत्ती घोड्याच्या पागा ठेविल्या विमानी शेळ्या मेढ्यांचे कळप घेतिले विमानी । वनीचे वन पाखरू राजाने विमानी घेतले नगरा सहित राजा विमानी बैसला । ध्वजा लावूनी राजा वैकुंठासी गेला । एवढा प्रताप हो एकादशी बाईने केला । जे गाती जे ऐकती त्याशी श्रीराम भेट देतीं । अंती होईल ग मोक्षाची प्राप्ती ।