जय जय भवानी, मनरमनी ,माता पुरवासिनी, चौदाभुवनाची स्वामीनी महिषासुर मर्दिनी ॥धृ॥
नेसुनी पटवा पिवळा, हार शोभे गळा, हाती धरुनीया त्रिशुल भाली कुंकूम टिळा ॥१॥
त्यालीसे काचोळी, वर मोत्यावी जाळी हृदया झळकली पिवळी , गळा हे गळसरी ॥२॥
पायी घागरीया खुळखुळ नाकी-मुक्ताफळ , माथा शोभतसे कुरळे, नयनी हे काजळ ॥३॥
सिंहावरी तु बैसूनी, मारीसी दानवजन । तुजला नमितो मी निशीदिन ,गोसावी नंदन ॥४॥