मीरासाठी जग जेठी कैसा विष्य प्याला ॥धृ॥
नऊ महीने मीरा उदरांत, मीरा तेथूनी बोलतात हरी हरी म्हणताची गजरची झाला ॥१॥
बालिका मीराबाई सदा लक्ष हरी पायीं, तिने केली पूर्ण सेवा हरी वंशची झाला ॥२॥
भाऊबंद इष्टमित्र करीतात नाना छंद, मीरा नाचे आनंद तोची जगताला ॥३॥
हाती विष्याचा प्याला पित्याने पाठविला, मीरा लावे ओठी प्याला अमृतची झाला ॥४॥
मीरा हेत विष प्याली, मूर्ती काळी निळी झाली, देव हिला पाहुनी भक्तीला भूलला ॥५॥