परिवृत्त पार्श्वकोणासन *
‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.
(चित्र क्र. १० व ११)
परिवृत्त म्हणजे फिरविलेला किंवा मागे वळविलेला. पार्श्व म्हणजे कूस किंवा बाजू
पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र.१)
२. दीर्घ श्वास घ्या आणि उडी मारुन पावलांमध्ये चार ते साडेचार फूट अंतर ठेवून उभे राहा. दोन्ही बाजूंनी हात उंचावून खांद्याच्या रेषेत आणा. तळहात जमिनीकडे वळवा. (चित्र क्र. ३)
३. उजवे पाऊल ९० अंशांनी उजवीकडे वळवा आणि डावे पाऊल ६० अंशांनी उजवीकडे वळवा. डावा पाय लांब ताणलेला आणि गुडघ्याशी घट्ट आवळलेला असू द्या. मांडी आणि पोटरी एकमेकांशी काटकोन करतील आणि उजवी मांडी जमिनीशी समांतर राहील अशा बेताने उजवा पाय गुडघ्यात वाकवा.
४. श्वास सोडा, धड डाव्या पायासहित असे वळवा की डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल. डावी काख उजव्या गुडघ्याच्या बाहेरच्या भागावर टेकवा आणि डावा तळहात उजव्या पावलाच्या बाहेरच्या कडेशी जमिनीवर ठेवा. (चित्र क्र. १० ते ११)
५. पाठीच्या कण्याला (उजवीकडे) कसून वळवा. धड वळवा आणि (चित्रात दाखविल्याप्रमाणे) उजवा हात उजव्या कानावर येऊ द्या. लांब ताणलेल्या उजव्या हाताच्या दिशेने दृष्टी लावा. डावा गुडघा सगळा वेळ घट्ट आवळलेला असू द्या.
६. समतोल व दीर्घ श्वसन करीत अर्धे ते एक मिनिट राहा. श्वास घ्या आणि डावा तळहात जमिनीवरुन उचला. धड वर उचला. उजवा पाय ताठ करुन आणि हात वर करुन क्र. २ च्या स्थितीत या.
७. श्वास सोडून क्र. ३ ते ५ या स्थिती उलटया म्हणजे डाव्या बाजूने करा.
८. जेव्हाजेव्हा आसनाच्या कृती प्रथम एका बाजूने आणि नंतर दुसर्या बाजूने करावयाच्या असतात, तेव्हातेव्हा प्रत्येक बाजूकडील कृतींना समसमान वेळ द्यावा. हा सर्वसामान्य नियम येथेही लागू आहे.
परिणाम
हे आसन परिवृत्त त्रिकोणासनापेक्षा (चित्र क्र.६) अधिक अवघड व अधिक परिणामकारक आहे. मात्र या आसनात गुढग्यांमागील शिरा परिवृत्त त्रिकोणासनातल्याइतक्या ताणल्या जात नाहीत. पोटातील अवयव अधिक आकुंचन पावतात आणि त्यामुळे पचनाला मदत होते. पोटातील अवयवांभोवती आणि पाठीच्या कण्याभोवती रक्ताभिसरण अधिक चांगल्या रीतीने होऊ लागते आणि या विभागांना नवजीवन लाभते. मोठया आतडयामधून मळ सहजपणे निघून जाण्यास या आसनामुळे मदत होते.
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2020
TOP