मालासन १ *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३२१)
माला म्हणज हार. हे आसन करण्याच्या दोन पध्दती असून त्या खाली दिल्या आहेत.
पध्दती
१. पावले एकत्र जुळवून कुल्ल्यावर बसा. चवडे आणि टाचा जमिनीवर पूर्णपणे टेकलेल्या असाव्यात. जमिनीवरुन ढुंगण उचला आणि तोल सावरा. (चित्र क्र. ३१७).
२. आता गुडघे फाकवा आणि धड पुढे न्या.
३. श्वास सोडा. वाकविलेल्या पायांभोवती हात लपेटा आणि तळहात जमिनीवर टेका. (चित्र क्र. ३१८)
४. आधी एक आणि नंतर दुसरा हात पाठीमागे न्या. आणि एकमेकांत बोटे गुंफा. (चित्र क्र. ३१९ आणि ३२०)
५. पाठ आणि मान वर खेचा.
६. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत ३० ते ६० सेकंद राहा.
७. आता श्वास सोडा. पुढे वाका व डोके जमिनीवर टेका. (चित्र क्र. ३२१)
याही स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करीत ३० ते ६० सेकंद राहा.
८. श्वास घ्या. डोके जमिनीवरुन उचला आणि क्र. ५ च्या स्थितीत पुन्हा या.
९. हात मोकळे करा आणि जमिनीवर विसावा घ्या.
परिणाम
या आसनामुळे पोटातील इंद्रिये सुधारतात आणि पोटदुखी नाहीशी होते.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP