मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
भुजंगासन १ *

भुजंगासन १ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ७३)
भुजंग म्हणजे सर्प. हे आसन करताना तोंड जमिनीकडे ठेवून उपडे झोपा. धडापासून वरचे शरीर वर उचला आणि दंश करु पहाणार्‍य़ा सर्पाच्या फण्याप्रमाणे डोके मागे झुकवा.

पध्दती
१. तोंड जमिनीकडे वळवून जमिनीवर पडा. पाय लांब करा. ते एकमेकाशे जुळलेले असू द्या. गुडघे आवळलेले आणि बोटे मागच्या दिशेला रोखलेली असू द्या.
२. तळहात ओटीपोटानजीक जमिनीवर टेकवा.
३. श्वास घ्या. तळहात जमिनीवर घट्ट दाबा आणि धड वर उचला (चित्र क्र. ७२). दोनदा श्वसन करा.
४. श्वास घ्या. धडपासून वरील सर्व शरीर अशा तर्‍हेने उचला की जघनास्थी जमिनीला लागून राहतील. पाय आणि तळहात यांवर भार देऊन या स्थितीत रहा (चित्र क्र. ७३)
५. गुदद्वार पुठ्ठयाच्या स्नायूसहित आकुंचित करा आणि मांडया आवळून धरा.
६. या स्थितीत नेहमीसारखे श्वसन करीत सुमारे २० सेकंद रहा.
७. श्वास सोडा. कोपरे वाकवा आणि धड जमिनीवर टेकवा. या आसनाची दोन ते तीन वेळा पुनरावृत्ती करा आणि विसावा घ्या.

परिणाम
हे आसन म्हणजे दुखावलेल्या पाठीच्या कण्यावर रामबाण उपाय आहे. कण्याच्या चकत्या किंचित सरकलेल्या असतील तर हे आसन केल्यामुळे त्या मूळच्या जागी येतात. पाठीच्या कण्याचा भाग सुदृढ बनतो आणि छाती
पूर्णपणे फुगवली जाते.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP