उपविष्ट कोणासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. १५१)
उपविष्ट म्हणजे बसलेला.
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. प्रथम एक आणि नंतर दुसरा असे पाय एकमेकांपासून दूर न्या. दोन पायांमधील अंतर शक्य तितके जास्त वाढवा, हा सारा वेळ पाय सरळ लांबवलेले ठेवा. आणि संपूर्ण पायाची मागची बाजू जमिनीला टेकलेली राहील याची दक्षता घ्या.
३. हातांचे आंगठे, तर्जनी आणि मधले बोट यांनी त्यात्या बाजूच्या पायांचे आंगठे पकडा.
४. पाठीचा कणा ताठ ठेवा. आणि बरगडया फुगवा. पोट व छाती यांमधील पडदा वर खेचा आणि दीर्घ श्वसन करीत काही सेकंद या स्थितीत राहा. (चित्र क्र. १४८)
५. श्वास सोडा. पुढे वाका आणि डोके जमिनीवर टेका. (चित्र क्र. १४९) नंतर मान ताणून हनुवटी जमिनीवर टेका. (चित्र क्र. १५०)
६. नंतर हातांनी पावले पकडा आणि छाती जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करा. (चित्र क्र. १५२) श्वास घ्या आणि डोके व धड उचला. आता उजवे पाऊल धरा. आणि श्वास सोडून उजव्या गुडघ्यावर हनुवटी टेका. श्वास घ्या. डोके आणि धड उचला. हात सोडा. पाय एका ठिकाणी आणा आणि विसावा घ्या.
परिणाम
या आसनामुळे गुडघ्यामागील शिरा ताणल्या जातात. ओटीपोटाच्या भागात रक्ताभिसरण योग्य तर्हेने होऊ लागते व तो भाग निकोप राहातो. अंतर्गळाचा विकार आटोक्यात राहातो आणि तो सौम्य स्वरुपाचा असल्यास बराही होतो. या आसनामुळे गुध्रसी या विकारामुळे होणार्या वेदना थांबतात. या आसनामुळे मासिक पाळी नियमित व नियंत्रित स्वरुपाची होते व अंडाशयाला चैतन्य लाभते. त्यामुळे हे आसन म्हणजे स्त्रियांना वरदानच होय.
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2020
TOP