एकपाद सर्वांगासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २५०)
एकपाद म्हणजे एक पाय. सर्वांगसनाच्या या प्रकारामध्ये एक पाय हलासनाप्रमाणे जमिनीवर असतो. तर दुसरा पाय धडाबरोबरच काटकोनात उभा असतो.
पध्दती
१. सालंब सर्वांगासन १ (चित्र क्र. २२३) करा.
२. डावा पाय सर्वांगासनामध्ये वरती ठेवा. श्वास सोडा आणि उजवा पाय हलासनाप्रमाणे (चित्र क्र. २५०) जमिनीवर न्या. उजवा पाय ताठ आणि सरळ ठेवावा. तो गुडघ्याशी वाकता कामा नये.
३. उजवा पाय जमिनीवर ठेवलेला असताना डावा गुडघा ताठ ठेवावा. तो बाजूला कलू देऊ नये. डावा पाय डोक्याकडे रोखलेला आणि ताठ ठेवावा.
४. या आसनात नेहमीप्रमाणे श्वसन करीत २० सेकंद राहा.
५. श्वास सोडा. उजवा पाय पुन्हा सर्वांगासनात न्या. आणि मग डावा पाय हलासनातल्याप्रमाणे जमिनेकडे न्या. त्याचवेळी उजवा पाय काटकोनामध्ये सरळ वर उभा ठेवा. जमिनीवरुन एक पाय उचलून सर्वांगासनात आणण्यामुळे पोटातील अवयवांना जो व्यायाम घडतो तो हलासनामध्ये दोन्ही पाय खाली आणताना होणार्या व्यायामापेक्षा अधिक असतो.
६. या बाजूच्या आसनात आधीच्या इतकाच वेळ राहा.
परिणाम
या आसनामुळे मूत्रपिंड आणि पायाचे स्नायू सुधारतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2020
TOP