मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
मूलबंधासन **

मूलबंधासन **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ४६२ आणि ४६३)
मूल म्हणजे मूळ, प्रारंभ किंवा पाया. बंध म्हणजे बेडी, साखळी, दोरी किंवा आसनातील स्थिती.

पध्दती
१. बध्द कोणासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०१)
२. मांडया आणि पोटर्‍या यांच्या मध्ये हात सरकवा. हातांनी पावले पकडा.
३. चवडे आणि टाचा एकत्र जुळवा. टाचा वर उचला. पायाची बोटे जमिनीवर ठेवा आणि पावले शिवणीजवळ आणा. (चित्र क्र. ४५९)
४. ही स्थिती पक्की करुन तळहात पुठ्ठयाच्या मागच्या बाजूवर टेकतील अशा तर्‍हेने हात मागे न्या. (चित्र क्र.४६०)
५. हातांच्या साहाय्याने शरीर जमिनीवरुन उचला आणि ढुंगण पुढे न्या. (चित्र क्र.४६१) त्याच वेळी पावले आणि गुडघे वळवून स्वत: न हलता टाचा पुढे न्या. (चित्र क्र. ४६२ आणि ४६३)
६. बोटे आणि गुडघे यांवर शरीर तोलून धरा आणि दीर्घ श्वसन करीत या स्थितीत ३० ते ६० सेकंद राहा.
७. या आसनातून मूळ स्थितीवर येण्यासाठी हात पुढे न्या आणि शरीराचा भार हातांवर घ्या. धड उचला, खोटे वळवा आणि पाय ताठ करा. शरीर मोकळे करताना शरीराचा भार पायांवर अजिबात येऊ देऊ नका.

परिणाम
या आसनामुळे मूलाधारचक्र, प्रोस्टेट ग्रंथी आणि जनन ग्रंथी यांना व्यायाम घडतो. वाजवीपेक्षा जादा लैंगिक वासनांचे नियमन करण्याचा आश्चर्यकारक परिणाम हे आसन घडवून आणते. त्यामुळे शक्तीची बचत होण्यास सहाय्य होते. त्यामुळे मन ताब्यात येते आणि शांत बनते. "मन हे इंद्रियांचे स्वामी, प्राण हा मनाचा स्वामी, लय किंवा तल्लीनता हा प्राणाचा स्वामी आणि लय हा नादावर अवलंबून. जेव्हा मन एकरुप होते तेव्हा त्या गोष्टीला मोक्ष असे म्हणतात. पण इतर काहीचे मत नकारार्थी आहे. काही असले तरी प्राण आणि मन तल्लीन झाले म्हणजे अवर्णनीय असा आनंद मिळू लागतो.” (हठयोगप्रदीपिका, अध्याय ४ था, श्लोक क्र. २९ व ३०) बध्दकोणासन (चित्र क्र.१०१) आणि मूलबंधासन ही आसने वाजवीपेक्षा अधिक लैंगिक वासना असलेल्या लोकांना अतिशय सहाय्यकारी आहेत. ही वासना नियंत्रित झाली म्हणजे शक्तीचे उन्नयन होते आणि असीम जीवनानंदाचा खराखुरा लाभ होतो.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP