मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
वालखिल्यासन **

वालखिल्यासन **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.५४४)
वालखिल्य हे ब्रह्मदेवाच्या शरीरापासून तयार झालेले अनेक ऋषी. ते एकूण साठहजार असून सूर्याच्या रथाच्या पुढे असतात. कालिदासाच्या रघुवंश महाकाव्यात त्यांचा संदर्भ आहे. कठिण आसन म्हणजे एक पाद राजकपोतासन १ (चित्र क्र.५४२) चा पुढील टप्पा. (एकपाद राजकपोतासन १ उत्तम रीतीने येऊ लागले आणि सहजपणे आणि डौलदारपणे करण्याचा सराव झाला म्हणजे मगच हे आसन शिकायला घ्यावे.)

पध्दती
१. एकपाद राजकपोतासन १ (चित्र क्र. ५४२) करा. डावा घोटा दोन्ही हातांनी घट्ट धरल्यानंतर पुठ्ठा आकुंचित करा आणि गुदास्थी वर खेचा. घोटयावरील पकड न सोडता डावा पाय मागे लांबवा. (चित्र क्र.५४३) व काही श्वास घ्या.
२. श्वास सोडा, हात आणखी लांबवा आणि पाय जमिनीवर राहावा यासाठी तो खाली ढकला. पायाची मांडीपासून बोटापर्यंतची पुढची सर्व बाजू जमिनीला लगटली पाहिजे. (चित्र क्र. ५४४)
३. या स्थितीत काही सेकंद राहा. छाती पूर्णपणे फुगलेली असून पोटाचे अवयव आकुंचित झालेले असल्यामुळे श्वसन जलद आणि अवघड होईल.
४. घोटयावरील पकड सोडा, पाठ सरळ करा आणि थोडा वेळ विसावा घ्या.
५. हे आसन दुसर्‍या बाजूने आधीइतकाच वेळ पुन्हा करा.

परिणाम
हे आसन जानुशीर्षासनाच्या (चित्र क्र.१२७) उलट हालचालीचे आहे. आणि त्याच्यामुळे कण्याच्या खालच्या भागात नवे चैतन्य येते. हे आसन करताना जघनाच्या भागात रक्ताभिसरण अधिक प्रमाणात होते व तो भाग निरोगी स्थितीत राहातो. याच्यासह राजकपोतासन चक्रातील इतर आसने केल्यामुळे मूत्रोत्सर्गाच्या यंत्रणेतील विकृती जातात. मान आणि खांद्यांचे स्नाय़ू यांना पूर्णपणे व्यायाम घडतो. कंठस्थ, उपकंठस्थ, मूत्रस्थ आणि जनन या ग्रंथींना रक्ताचा भरपूर पुरवठा होऊन चैतन्यशक्ती वाढते. हे व राजकपोतासन चक्रामधील इतर आसने विषयवासनेचे दमन करण्यासाठी अवश्य करण्यासारखी आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP