मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
वामदेवासन १ *

वामदेवासन १ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ४६५)
वामदेव हे एका ऋषीचे, त्याचप्रमाणे त्रिमूर्तीपैकी संहाराची म्हणजे तिसरी देवता जो शंकर त्याचेही एक नाव आहे.

पध्दती
बध्द कोणासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०१)
२. उजवी मांडी आणि पोटरी यांमध्ये उजवा हात सरकवा. उजव्या पावलाची बोटे जमिनीवर टेकलेली ठेवा. टाच जमिनीकडे ढकलून शरीर जमिनीवरुन उचला. उजवीकडील पुठ्ठा पुढे न्या. आणि उजवा गुडघा जमिनीवर ठेवा. आता उजवे पाऊल मूल बंधासनमध्ये असेल. (चित्र क्र.४६४)
३. आता डावे पाऊल उजव्या मांडीच्या मुळाशी, पद्मासनातल्याप्रमाणे ठेवा (चित्र क्र. १०४)
४. डावा हात खांद्यापासून पाठीमागे न्या आणि श्वास सोडून डाव्या पायाचा आंगठा पकडा. उजव्या हाताने डाव्या पावलाची पुढची बाजू पकडा.
५. मान उजवीकडे वळवा. (चित्र क्र. ४६५) आणि दीर्घ श्वसन करीत ३० सेकंद तोल सांभाळा.
६. या स्थितीतून शरीर मोकळे करुन पुन्हा बध्द कोणासनामध्ये या आणि वर दिलेल्या सूचनांमध्ये ‘उजवा’ व ‘डावा’ या शब्दांची उलटापालट करुन हे आसन दुसर्‍या बाजूने आधीच्या इतकाच वेळ करा.

परिणाम
या आसनामुळे पायांमधील ताठरपणा नाहीसा होतो आणि वेदना थांबतात. जननेंद्रिये निरोगी राहातात. पाठीचा कणा सुदृढ बनतो. आणि पचनक्रियेला मदत होते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP