मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
गोमुखासन *

गोमुखासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ८०)
गो म्हणजे गाय आणि मुख म्हणजे चेहरा. एका टोकाला रुंद अशा एका वाद्यालाही गोमुख असे म्हणतात.

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. तळहात जमिनीवर टेका आणि ढुंगण वर उचला.
३. डावा गुडघा मागच्या बाजूस वाकवा आणि डाव्या पावलावर बसा. हात जमिनीवरुन उचला. उजवा पाय वर उचला. आणि उजवी मांडी डाव्या मांडीवर ठेवा. कुल्ले उचला आणि हातांच्या मदतीने घोटे व टाचांचे मागचे भाग एकमेकांना स्पर्श करतील अशा तर्‍हेने एकत्र आणा.
४. घोटे जमिनीवर टेका. पायाची बोटे मागे रोखलेली असू द्या.
५. डावा हात डोक्याच्या वर उचला. तो कोपराशी वाकवा आणि डावा तळहात मानेच्या खाली खांद्यांच्यामध्ये टेका. उजवा हात खाली न्या. कोपराशी वाकवा आणि कोपरापुढील हात मागील बाजूने वर न्या. उजवा हात खांद्याच्या पात्यांच्या पातळीला आणि त्यांच्यामध्ये आला पाहिजे. पाठीमागच्या बाजूला दोन खांद्यांच्यामध्ये दोन्ही हात एकमेकामध्ये गुंफा. (पुढील दृश्य : चित्र क्र. ८०; मागील दृश्य : चित्र क्र. ८१.)
६. नेहमीसारखे श्वसन करीत या स्थितीत ३० ते ६० सेकंद रहा. मान आणि डोके सरळ उभे ठेवा. आणि नजर सरळ समोर राहू द्या.
७. हात मोकळे करा. पाय सरळ करा आणि दुसर्‍या बाजूने आधीइतकाच वेळ हे आसन पुन्हा करा. ‘डावा’ आणि उजवा’ या शब्दांची उलटापालट करुन हे उलट बाजकडचे आसन करा. मग पाठीमागचे हात मोकळे करा. पाय सरळ करा आणि विसावा घ्या.

परिणाम
या आसनामुळे पायातले पेटके बरे होतात. पायाच्या स्नायूंना लवचिकपणा लाभतो. या आसनात छाती चांगली फुगवली जाते आणि पाठ सरळ व ताठ बनते. खांद्यांचे सांधे अनिर्बंधपणे हालचाल करु लागतात. आणि कंबरेचे मागचे स्नायू पूर्णपणे ताणले जातात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP